कुठून ही काम करा आणि ऑनलाइन पैसा कमवा प्रशिक्षण मध्ये तुमचे स्वागत आहे

 

 

ऑनलाइन मार्केटिंग म्हणजे काय आहे?

ऑनलाईन मार्केटिंग करून पैसे मिळवणे म्हणजे काय आहे?

 

 

सोप्या भाषेत सांगायचे तर जर तुमचा काही व्यवसाय असेल, तर त्या व्यवसायासाठी इंटरनेट चा वापर करून गिऱ्हाईक मिळवणे म्हणजे त्या व्यवसायाचे ऑनलाइन मार्केटिंग.

 

जर तुमचा काही व्यवसाय नसेल, तुम्हाला कुठली हि नोकरी नसेल, पण तरीही तुम्हाला पैसा कमवायचा

 

तर इंटरनेट चा वापर करून, इतर लोकांच्या उत्पादनाचे किंवा व्यवसायाचे  व्हॅट्स ऍप, फेसबुक, ई. सोशल मिडिया चा वापर करून किंवा तुमच्या वेबसाईट च्या माध्यमातून त्यांना गिऱ्हाईक मिळवून देणे, म्हणजे तुम्ही त्या लोकांच्या उत्पादनाचे किंवा व्यवसायाचे करणाऱ्याचे केलेले ऑनलाइन मार्केटिंग.


तुम्ही त्यांना गिऱ्हाईक मिळवून दिले म्हणून ते तुम्हाला काही न काही पैसे देतात. याला म्हणतात ऑनलाईन मार्केटिंग करून पैसे मिळवणे.

 

उदाहरण द्यायचे झाल्यास
उदाहरण एक.
तुम्ही एखाद्या दुकानात जातात.
तुम्ही त्या दुकानात काही खरेदी केले किंवा काही खरेदी केले नाही पण त्या दुकानात ठेवलेला माल / वस्तूंची किंमत तुम्हाला योग्य किंवा इतर दुकाना पेक्षा स्वस्त वाटली, चांगली वाटली, तर तुम्ही तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना त्या दुकानात पाठवतात / जायला सांगतात.

तुमचे मित्र, नातेवाईक त्या दुकानात जातात, जर त्यांना सुध्दा त्या दुकानात ठेवलेला माल/वस्तूंबद्दल व त्याची किंमत त्यांना योग्य किंवा इतर दुकाना पेक्षा स्वस्त वाटली तर ते तिथून खरेदी करतात. दुकानदाराची कमाई होते. पण तो दुकानदार तुम्हाला काय देतो? काहीच नाही.

 

उदाहरण दोन.
तुम्ही एखाद्या सेवा देणाऱ्या कडे जसे एखादा टेलर, एखादा प्लंबर, एखादा मेकेनिक, एखादा डॉक्टर, किंवा एखादा ऑनलाईन सेवा देणारा ई. कडे जातात.

तुम्ही त्या सेवा देणाऱ्या कडून एखादी सेवा घेता, त्या सेवा देणाऱ्या ची सेवा व त्याने त्यासाठी मागितलेले शुल्क तुम्हाला योग्य किंवा इतर सेवा देणाऱ्या पेक्षा स्वस्त वाटले, तर तुम्ही तुमच्या मित्रानंना, नातेवाईकांना पाठवतात किंवा जायला सांगतात.

तुमचे मित्र, नातेवाईक त्या सेवा देणाऱ्या कडे जातात, जर त्यांना सुध्दा त्या सेवा देणाऱ्याच्या सेवा, व त्याची सेवा देण्यासाठी मागितलेले शुल्क त्यांना योग्य किंवा इतर सेवा देणाऱ्या पेक्षा स्वस्त वाटली तर ते तिथून सेवा घेतात. सेवा देणाऱ्याची कमाई होते. पण तो सेवा देणारातुम्हाला काय देतो? काहीच नाही.

 

पण जर तुम्ही हेच काम एफ़िलिएशन घेऊन एखाद्या इन्टरनेट मार्केटिंग करणाऱ्या दुकानासाठी किंवा ई-कॉमर्स करणाऱ्या वेबसाईट साठी किंवा इतर एखाद्या वेबसाईट साठी केले तर ते तुम्हाला त्यांना गिऱ्हाईक मिळवून दिले म्हणून काही न काही पैसे देतात. याला म्हणतात ऑनलाईन मार्केटिंग करून पैसे मिळवणे.

 

पुन्हा वरती